Sunday, July 27, 2025
Homeसांगली३२ तोळे सोने लांबविणार्‍या चोरट्यास मिरजेत अटक

३२ तोळे सोने लांबविणार्‍या चोरट्यास मिरजेत अटक

ताजी बातमी ऑनलाइन टीम

येथील रमा उद्यानमध्ये घर दुरस्तीसाठी येऊन 32 तोळे सोन्यावर डल्ला मारणार्‍या आरिफ मोहंमद शरीफ शेख (वय 38, रा. धनगर गल्ली, मिरज) या चोरट्याला मिरज शहर गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा तोळे सोने हस्तगत केले आहे.



पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आम्रपाली सतीश जमणे या रमा उद्यान येथे राहण्यास आहेत. वादळामुळे त्यांच्या घरावरील पत्रे उडाले होते. ते दुरुस्त करण्यासाठी आरिफ शेख हा दि. 17 एप्रिल रोजी काही कर्मचार्‍यांसमवेत आला होता.

पत्रे बसविण्याचे काम सुरू असताना त्याची नजर जमणे यांच्या घरातील बेडरुममधील लॉक नसलेल्या कपाटावर गेली. जमणे यांच्या कुटुंबातील सदस्यांची नजर चुकवून शेख याने कपाटातील सोन्यावर डल्ला मारुन पोबारा केला होता. त्यानंतर कपाटातील तब्बल 32 तोळे सोने चोरीस गेल्याची तक्रार आम्रपाली जमणे यांनी दिली होती.

याबाबत तपास करीत असताना मिरज शहर पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व गुन्हे प्रकटीकरणचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांना पत्रे दुरुस्तीसाठी आलेल्या शेख यानेच ही चोरी केली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पृथ्वीराज कांबळे, विष्णू काळे, नागेश मासाळ, गजानन बिरादार, अमित कोळी, दीपक परीट आणि दत्तत्रय फडतरे यांच्या पथकाने शेख याच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा तोळे सोने हस्तगत केले आहेत. त्याच्याकडे अन्य सोन्याबाबत चौकशी केली असता त्याने दहा तोळेच सोने चोरले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -