Saturday, July 26, 2025
Homeब्रेकिंगSBI चा ग्राहकांना झटका! Home Loan, Car Loan झाले 'इतके' महाग

SBI चा ग्राहकांना झटका! Home Loan, Car Loan झाले ‘इतके’ महाग

देशातील सर्वात मोठी बँक SBI या MCLR वर 15 एप्रिलपासून होम लोन, कार लोन आणि इतर लोन घेणे महागले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने मार्जिनल कॉस्ट
ऑफ लेंडिंग रेट वर घेतलेल्या सर्व मुदतीच्या लोन वरील व्याजदरात 0.10 टक्के वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये MCLR मध्ये ही वाढ 15 एप्रिलपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दर किती वाढले ते जाणून घ्या बँकेने एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR 6.65 टक्क्यांवरून 6.75 टक्के केला आहे. त्याच वेळी, MCLR सहा महिन्यांसाठी 6.95 टक्क्यांवरून 7.05 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षाचा MCLR 7 टक्क्यांवरून 7.10 टक्के केला आहे. दोन वर्षांचा MCLR 7.20 टक्क्यांवरून 7.30 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 7.30 टक्क्यांवरून 7.40 टक्के करण्यात आला आहे.

बँक ऑफ बडोदानेही वाढवले आहेत दर दरम्यान, बँक ऑफ बडोदानेही सर्व मुदतीच्या लोनवरील MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. ही दरवाढ 12 एप्रिलपासून लागू झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.

एका वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 7.35 टक्के करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. त्याच वेळी, एक दिवस, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR अनुक्रमे 6.50 टक्के, 6.95 टक्के, 7.10 टक्के आणि 7.20 टक्के करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -