Saturday, July 26, 2025
Homeराजकीय घडामोडीराज ठाकरे यांना तात्काळ अटक करा: माजी आमदाराचे उपोषण

राज ठाकरे यांना तात्काळ अटक करा: माजी आमदाराचे उपोषण

मशिदीवरील भोंगे काढून टाका असे म्हणून भारतीय घटनेविरोधात काम करणाऱ्या व दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांना तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ठाकरे घराण्यात जन्म झाला असला तरी त्यांचे देशाच्या जडणघडणीत कोणतेही योगदान नाही. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. खरंतर राज ठाकरेंनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीचा आदर्श घेतला पाहिजे. परंतु राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करत आहेत. त्यांनी कोणाची सुपारी घेतली आहे, हे सर्वजण जाणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय संवेदनशील परिस्थितीवर एक शब्द देखील बोलत नाहीत. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा.

भोंगे काढले नाहीत तर आम्ही तलवारी काढू असे वक्तव्य करणा-या राज ठाकरेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र तसं झाले नाही. त्यामुळे मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण भावाची समजूत काढावी अन्यथा घटनात्मक विधिमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -