अर्जुन तेंडुलकर इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करताना दिसत आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अर्जुनबाबत सातत्याने अशा पोस्ट शेअर केल्या जात आहेत, त्यामुळे या अष्टपैलू खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते, असे चाहत्यांना वाटते. अर्जुनने अद्याप एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. आज (दि. 21), आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) होणार आहे, या सामन्यापूर्वी फ्रँचायझीने अर्जुनच्या अचूक यॉर्कर बॉलचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अर्जुनचा (Arjun Tendulkar) हा चेंडू पाहून चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की, आता हा खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी तयार आहे आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळावे. जसप्रीत बुमराहच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनने त्याच्या गोलंदाजीवर बरेच काम केलेले दिसते. बुमराह हा मुंबई इंडियन्स संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. याशिवाय भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान देखील मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे.