Sunday, July 27, 2025
Homeमनोरंजनअक्षय कुमारने मागितली चाहत्‍यांची माफी

अक्षय कुमारने मागितली चाहत्‍यांची माफी

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमी आपल्‍या नव्‍या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता अशीही त्‍याची बॉलीवूडमध्‍ये ओळख आहे. सध्‍या अक्षय कुमारची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. एका पान मसाल्‍याच्‍या जाहिरातीमध्‍ये काम केल्‍याने तो चर्चेत आला आहे. या जाहिरातीमध्‍ये दिसल्‍याने तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. चाहत्‍यांनी टीकेची झोड उठवल्‍यानंतर त्‍याने याबाबत महत्त्‍वाचा निर्णय घेतला आहे.

पान मसाला जाहिरातीवरुन ट्रोल होत असल्‍याने अक्षय कुमारने आपल्‍या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्‍ट शेअर केली आहे. त्‍याने आपल्‍या चाहत्‍यांची माफी मागितली असून, संबंधित पान मसालाचा ब्रँड अँबेसिडर राहणार नसल्‍याचे त्‍याने म्‍हटलं आहे.

जाहिरातीचे मानधन चांगल्‍या कार्यासाठी खर्च करणार
आपल्‍या पोस्‍टमध्‍ये अक्षय कुमारने चाहत्‍यांना म्‍हटलं आहे की, “मला माफ करा. मी माझे चाहते. हितचिंतकांची माफी मागतो. मागील काही दिवस सोशल मीडियामध्‍ये माझ्‍याबद्‍दल आलेल्‍या प्रतिक्रियांमुळे मी प्रभावित झालाे आहे. मी कधीच तंबाखूजन्‍य पदार्थांना प्रोत्‍साहन दिले जाईल, असे वर्तन केलेले नाही. पान मसाल्‍याच्‍या जाहिरातमध्‍ये काम केल्‍यामुळे तुमच्‍या दुखावललेल्‍या भावनांचा मी सन्‍मान करतो. त्‍यामुळे मी अत्‍यंत विनम्रपणे यातून माघार घेत आहे. या जाहिरातीमधून मिळालेले मानधन मी चांगल्‍या कार्यासाठी खर्च करेन”.
संबंधित पान मसाला कंपनी जाहिरात करार असेपर्यंत ही जाहिरात दाखवू शकते. भविष्‍यात मी कोणत्‍या जाहिरातीमध्‍ये काम करायचे हे विचाराअंतीच ठरवेन, असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -