Monday, February 24, 2025
Homeराजकीय घडामोडी'चला अयोध्येला' मनसेकडून अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु, शिवाजी पार्कमध्ये बॅनरबाजी!

‘चला अयोध्येला’ मनसेकडून अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु, शिवाजी पार्कमध्ये बॅनरबाजी!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘चलो अयोध्या’ची घोषणा केली आहे. येत्या 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्याची मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून ठिकठिकणी अयोध्या दौऱ्यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात येत आहेत. अशामध्ये दादरच्या शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोरच मनसेने अयोध्या दौऱ्याचे बॅनर लावले आहे.

शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या मनसेच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा भगवाधारी फोटो पाहायला मिळत आहे. या बॅनरवर ‘राज तिलक की करो तैयारी, आ रहे है भगवाधारी’ असे लिहिण्यात आले आहे. याशिवाय या बॅनरवर ‘चला अयोध्या, आम्ही चाललोय तुम्हीही चला’ असे लिहण्यात आले असून या माध्यमातून मनसेने नागरिकांना अयोध्या दौऱ्याला चला असे आवाहन केले आहे.

दरम्यान, या पोस्टर आणि बॅनरबाजीवरुन मनसेने अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. या दौऱ्याबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये देखील कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून रेल्वेकडे 10 ते 12 रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. या दौऱ्याला राज ठाकरे यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने मनसे कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक आणि नागपूर या ठिकाणावरुन अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे गाड्या बुक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -