Sunday, February 23, 2025
Homeजरा हटकेश्रद्धाच्या बेबी पिंक रंगाच्या 'स्पोर्ट्स ब्रा'नं चाहते घायाळ

श्रद्धाच्या बेबी पिंक रंगाच्या ‘स्पोर्ट्स ब्रा’नं चाहते घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या महिन्यात तिच्या आणि बॉयफ्रेंड फोटोग्राफर रोहन श्रेष्ठच्या ब्रेकअपने चर्चेत आली होती. श्रद्धा सोशल मीडियावर सक्रिय असून आपले अपडेट चाहत्यासोबत शेअर करत असते. सध्या श्रद्धाच्या बेबी पिंक रंगाच्या स्पोटर्स ब्राने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर बेबी पिंक रंगाच्या स्पोर्ट्स ब्रामधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत श्रद्धा खास करून सिंपल लूक आणि विना मेकअपमध्ये खूपच गॉर्जियस दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने फक्त ‘🩰’असा हटके ईमोजी दिला आहे. या फोटोत खास म्हणजे, श्रद्धा कपूरची टोन्ड फिगर दिसून येत आहे. यावरून वयाच्या ३५ वर्षीही श्रद्धा फिटनेस मेंटेन करत असल्याचे दिसतेय.

श्रद्धाच्या एका फोटोत कॅमेऱ्यासमोर टोन्ड फिगर स्पष्टपणे समोरून दिसली. तर दुसऱ्या फोटोला पोझ देताना तिने आपल्या डाव्या बाजुला पाहिल्याचे दिसून येत आहे. श्रद्धाचा हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी श्रद्धाच्या फिगरचे कौतुक करत भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सनी ‘Gorgeous 😍’, ‘Looking so hot 🔥’, ‘Wow 😯’. दुसऱ्या एका युजर्सने ‘😍😍😍😍soooo beautiful’, ‘Gorgeous Queen 😍❤🔥🔥’. असे लिहिले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी श्रद्धाच्या फोटोवर कॉमेन्टस करताना स्मायली आणि हार्ट ईमोजी शेअर केले आहेत.

श्रद्धा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती रणबीर कपूरसोबत आगामी ‘लव रंजन’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे ‘चालबाज इन लंडन’, ‘स्त्री २’ आणि विशाल फुरिया याचा ‘नागीन’ चित्रपट आहेत. श्रद्धा शेवटची टायगर श्रॉफसोबत ‘बागी ३’ मध्ये दिसली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -