विजेचा शॉक लागून ४ वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मूत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चव्हाणमळा-होलेवाडी (ता. खेड) येथे गुरुवारी (दि २१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. शिवम सोमनाथ टाकळकर असे मुत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नांव आहे.
होलेवाडी-चव्हाणमळा येथील गुरूदेव साम्राज्य सोसायटीमध्ये चार वर्षाचा शिवम घराबाहेरील गॅलरीत खेळत होता. खेळता-खेळता गॅलरीच्या भिंतीला असलेल्या नादुरुस्त विद्युत दिव्याला शिवमचा पायाचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसला. या विजेच्या धक्यात शिवमचा जागीच मुत्यू झाला.
याबाबत सागर सतिश वाबळे यांनी खेड पोलिस ठाण्यात खबर दिली असून, अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.