ताजी बातमी ऑनलाईन टीम
“कलेतून निसर्ग संवर्धनाकडे” असा निसर्गपूरक संदेश देत अमूज क्राफ्टने वर्ल्ड फॉर नेचर कोल्हापूर, खोपा बर्डस हाऊस व आभाळमाया फौंडेशनच्या सहकार्याने वसुंधरा दिनाचे औचित्य साधून ‘चिमणीच्या घरट्यावर चित्रकला’ स्पर्धांचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांना निसर्गमूल्यांची ओळख व्हावी व त्यांनी निसर्ग संवर्धनाचे धडे शालेय जीवनापासून गिरवावेत यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी, महावीर गार्डन, कोल्हापूर येथे सकाळी ८ ते १० या वेळेत घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा वेगवेगळ्या गटात होणार आहे.

१ ली ते ४ थी हा लहान गट, ५ वी ते ९ वी मोठा गट,
१० वी ते महाविद्यालयीन असा खुला गट आहे. तसेच प्रत्येक गटासाठी चित्रकलेचा एक विषय आहे.
या स्पर्धेसाठी निःशुल्क प्रवेश फी आहे व ‘अमूज क्राफ्ट’ कडून सर्व विद्यार्थी स्पर्धकांना घरटी पुरविण्यात येणार आहेत व त्यांनंतर या घरट्याला विद्यार्थ्यांनी सृजनशील व कल्पकतेने रंगवायचे आहे व स्पर्धा संपल्यानंतर सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी रंगवलेली घरटी त्यांना परत देण्यात येणार आहेत व ही त्यांनी आपल्या घरात व परिसरात चिमण्यांचा अधिवास जपण्यासाठी लावायची आहेत.

मित्रांनो आपल्या कोल्हापूर शहरात प्रथमच अशा पद्धतीची सृजनशील स्पर्धा होत आहे की ज्यामुळे “चित्रकला व निसर्ग संवर्धन” अशा दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत व सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना निसर्गमूल्यांची ओळख होणार आहे.
मग बालमित्रांनो येणार ना स्पर्धेला?

नक्की या व तुमच्या कलेच्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाची सेवा करत चिऊताईसाठी एक घरटे रंगवा व आपला आनंद द्विगुणित करा.
(स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८७६६५३७२७४ व ९४०४००९१८७ या नंबरवर संपर्क साधावा)