ताजी बातमी ऑनलाइन टीम
बॉलिवूडची दबंग गर्ल अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मालदीवमध्ये इन्जॉय करत आहे. नुकताच सोनाक्षीने मालदीवमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोनाक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोनाक्षीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा मालदीवच्या सुमद्र किनाऱ्यावर उभं राहून जबरदस्त पोज देताना दिसत आहे.
फोटोंमध्ये सोनाक्षीने शिमरी लेहंगा घातला आहे. सोनाक्षीने ड्रेससोबत नेकपीस घातला असून तिने केस मोकळे सोडले आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.

सोनाक्षीच्या या फोटोंना नेटिझन्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. चाहत्यांचा कमेंट्स बॉक्स हार्ट इमोजीने भरला आहे. हे फोटो पाहून सोनाक्षीचे चाहते घायाळ झाले आहेत.
या फोटोमध्ये अभिनेत्री समुद्र किनाऱ्यावरील दगडावर उभी राहिलेली दिसत आहे. तिने आकाशी कलरचा लेहंगा घातला आहे. या फोटोमध्ये ती एखाद्या जलपरीसारखी दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हा या फोटोमध्ये समुद्र किनाऱ्यावर उभी राहिली असून तिच्या आसपासचा नजारा खूपच सुंदर दिसत आहे.