Tuesday, July 8, 2025
HomeसांगलीSangli : भैरवनाथ यात्रेत भक्तांवर मधमाशांचा दोनदा हल्ला

Sangli : भैरवनाथ यात्रेत भक्तांवर मधमाशांचा दोनदा हल्ला

वाळवे तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेत शुक्रवारी मंदिरात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी जोरदार हल्ला चढवला. यात यात हजारो भाविक जखमी झाले असून भाविकांची एकच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

ग्रामदैवत भैरवनाथ देवालयाच्या शेजारी अनेक वर्षांपूर्वीचे वडाचे व गोरखचिंचेचे भलेमोठे वृक्ष आहेत. या झाडांवर विविध प्रकारच्या पक्ष्यांसह वानरांचे वास्तव्य असते. तसेच झाडांवर मधमाशांचे पोळ्याही आहे. शुक्रवारी मधमाशांच्या हल्ल्यात अनेक भाविक गंभीर जखमी झाले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील व कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. नागनाथ चौगुले यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींवर औषधोपचार करण्यात आले. मात्र, या वेळी डॉक्टरांवरही मधमाशांनी हल्ला चढवला. दोन दिवसांपूर्वीच बहिरी ससाण्याच्या हल्ल्यात मधमाशांचा उठाव झाला. त्या वेळी मंदिरासमोरून ये-जा करणाऱ्या अनेक भाविकांवर त्यांनी हल्ला केला होता. त्यात अनेक जण जखमी झाले होेते. त्यानंतर मधमाशा अचानक निघून गेल्या होत्या. मात्र, शुक्रवारी पुन्हा एकदा मधमाशांनी हल्ला चढवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -