Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगअखेर रवी राणा यांनी आंदोलन मागे घेतल्याची केली घोषणा, म्हणाले...

अखेर रवी राणा यांनी आंदोलन मागे घेतल्याची केली घोषणा, म्हणाले…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मातोश्रीवर (Matoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा देणाऱ्या आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Mumbai Tour) यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आंदोलन मागे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा रवी राणा यांनी केली.



रवी राणा आणि नवनीत राणा यांनी 24 एप्रिल रोजी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. रवी राणा यांच्या घराबाहेर आणि मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. याच पाश्वभूमीवर राणा दाम्तत्यांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे सांगितले आहे.



रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. राज्यात पोलिसांना, सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे रवी राणा यांनी सांगितले आहे. तसंच, ‘आमचा आग्रह हनुमान चालिसासाठी होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही स्वत:हून हे आंदोलन मागे घेत आहोत. बाळासाहेबांचे विचार थोडेसे जरी तुमच्यात असतील तर तुम्ही योग्य मार्गावर नक्की याल, असे रवी राणा म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -