ताजी बातमी ऑनलाईन टीम
तारळे विभागातील आंबळे (ता. पाटण) येथिल सोमेश्वर विलास कदम (वय १३) या मुलाचा मधमाशांच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करताना दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
शेरेवाडी (ता. सातारा) परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले ट्रॅकर टीमने मृतदेह दरीतून बाहेर काढला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.