ताजी बातमी ऑनलाईन टीम
लासलगाव बाजार समितीमध्ये ‘नाफेड’ कडून कांदा खरेदीला सुरवात ‘नाफेड’ ही एक बहुराज्य सहकारी संस्था आहे. केंद्र सरकार या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान दर मिळवून देण्याचा प्रयत्न करते. सध्या नाफेड ही संस्था राज्यातील विविध बाजारपेठेतून कांदा खरेदी करीत आहे. मात्र, कांद्याला अगोदर हमीभाव ठरवून द्यावा आणि मगच खरेदी करावी अशी भूमिका कांदा उत्पादक संघटनेने घेतली
आहे.
लासलगाव : ‘नाफेड’ ही एक बहुराज्य सहकारी संस्था आहे. (Central Government) केंद्र सरकार या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान दर मिळवून देण्याचा प्रयत्न करते. सध्या (NAFED) नाफेड ही संस्था राज्यातील विविध ८ बाजारपेठेतून कांदा खरेदी करीत आहे. मात्र, (Onion Crop) कांद्याला अगोदर हमीभाव ठरवून द्यावा आणि मगच खरेदी करावी अशी भूमिका कांदा उत्पादक संघटनेने घेतली आहे. तर दुसरीकडे कांदा खरेदीच्या बाबतीत नाफेडकडून दुजाभाव केला जात आहे. शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करताना तो एकाच दरात करणे अपेक्षित आहे. मात्र, नाशिक बाजार समितीमध्ये 12 रुपये किलोप्रमाणे तर अहमदनगर येथे 10 रुपये किलोप्रमाणे खरेदी केली जात आहे. त्यामुळे ‘नाफेड’च्या भूमिकेबाबतच कांदा उत्पादक संघटनेने संशय उपस्थित केला आहे.