Thursday, July 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : कारच्या धडकेत कल्लेहोळचा वृद्ध जागीच ठार

कोल्हापूर : कारच्या धडकेत कल्लेहोळचा वृद्ध जागीच ठार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भरधाव कारच्या धडकेत शंकर बाळू यादव (वय ६०, रा. कल्लेहोळ ता. जि. बेळगाव ) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी बेळगाव- वेंगुर्ला रस्त्यावरील तांबूळवाडी फाटा आणि ताम्रपर्णी नदीवरील पुलानजीक घडला.



गवसे ( ता. चंदगड) येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभाला शंकर यादव गेले होते. लग्न उरकून ते कल्लेहोळ गावी आपल्या दुचाकीवरुन जात होते. यावेळी बेळगावहून चंदगडच्या दिशेने गजेंद्र बाळाप्पा मुकप्पापोळ ( रा. सिद्धीहोळी ता. गोकाक, जि. बेळगाव ) हे भरधाव कारने जात होते. त्यांच्या कारने यादव यांच्या स्कुटीला जोराची धडक बसली. यादव यांना सुमारे दीडशे फूट फरफटत नेले. कार उंचावरून शेतात पलटी झाली. सुदैवाने एअर बॅग ओपन झाल्याने गजेंद्र बचावले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -