ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर मंथ एंड मोबाईल्स फेस्ट सेल सुरू आहे. या सेल दरम्यान तुम्हाला स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट मिळणार आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करायचा असेल तर हा सेल तुमच्या उपयोगी पडू शकतो.
1) फ्लिपकार्टच्या मंथ एंड मोबाईल्स फेस्टमध्ये मोटोरोला (Motorola) कंपनीचा Moto G71 5G स्मार्टफोन 22,999 रुपयांऐवजी फक्त 17,999 रुपयांना विकला जातोय. यावर ॲक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही 750 रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकता. यासोबतच एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्हाला 13,000 रुपयांपर्यंतच्या बचतीचा लाभ घेता येऊ शकतो. असं सर्व मिळून तुम्ही हा फोन 4,249 रुपयांना खरेदी करू शकता.
2) जगातील प्रसिद्ध कंपनी सॅमसंग (Samsung) फ्लिपकार्टच्या मंथ एंड मोबाईल्स फेस्टमध्ये आपला Samsung Galaxy F23 5G फोन 16,999 रुपयांना विकला जात आहे तर त्याची मूळ किंमत 23,999 रुपये आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने स्मार्टफोन घेतल्यास, तुम्ही 1000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. याशिवाय एक्सचेंज ऑफरवर तुमचा जुना स्मार्टफोन देऊन नवा स्मार्टफोन घेण्यासाठी सूट मिळवू शकता.
3) स्मार्टफोन विक्रीत हळूहळू आपला ठसा उमटवणाऱ्या पोको (Poco) कंपनीचा 5G स्मार्टफोन 19,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 23,999 रुपये आहे. Axis Bank क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्ही 1,000 रुपयांची सूट मिळवू शकता आणि तुमचा जुना स्मार्टफोन एक्स्चेंज करून तुम्ही 13,000 रुपयांपर्यंतच्या बचतीसह 5,999 मध्ये Poco X4 Pro 5G खरेदी करू शकता.
4) Flipkart Month End Mobile Fest मध्ये 22,999 रुपयांच्या किंमतीचा Realme 8s 5G स्मार्टफोन हा फक्त 18,999 रुपयांना विकला जातोय. प्रीपेड ऑफरसह 1500 रुपये बचत होऊ शकते. यासोबतच एसबीआय (SBI) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) कार्डने व्यवहार केल्यास 1000 रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 13 हजारांपर्यंत सूटदेखील भेटेल. एकूणच, तुम्ही हा फोन 3,499 रुपयांत खरेदी करून घरी आणू शकता.
5) फ्लिपकार्टच्या मंथ एंड मोबाईल्स फेस्टमध्ये 19,990 रुपये किंमत असणारा विवो कंपनी (Vivo) चा 5G स्मार्टफोन 15,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरून 1,000 रुपये वाचवले जाऊ शकतात. एक्सचेंज ऑफरद्वारे 13,000 रुपयांपर्यंतची बचत तुम्ही करू शकता. याद्वारे तुम्हाला Vivo T1 5G हा फोन 1,990 रुपयांमध्ये मिळू शकतो.
(टीप : ऑफर्स मधील स्मार्टफोन्सच्या किंमतीत कमी-अधिक बदल होऊ शकतो किंवा स्टॉक कधीही संपू शकतो.)