यंदाच्या आयपीएल 2022 मध्ये अनेक सामने रंगतदार स्थितीत पाहायला मिळालेत. आयपीएलचा आनंद घेण्यासाठी लोक स्टेडियममध्ये खचाखच भरू लागले आहेत. सध्याच्या 15 व्या हंगामाला सरूवात झाली असली तरी प्ले-ऑफ्स चे (IPL Playoffs) सामने कुठे खेळवले जाणार हे निश्चित नव्हतं. आता त्याबाबत बीसीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
प्ले-ऑफ्स चे सामने कुठे खेळवले जाणार..?
आतापर्यंत बरेच रोमांचक सामने प्रेक्षकांनी बघितले आता क्रिकेटप्रेमी आयपीएल पाहण्यासाठी निर्बंधमुक्त वातावरणात सध्या पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी जात आहेत. काल लखनौ सुपरजायंट्स व मुंबई इंडियन्स दरम्यान 37 वा सामना पार पडला असता आता जवळजवळ 1 महिना आयपीएल संपण्यास उरला आहे.
IPL Season 15 चे काही सामने झाले आहेत आता अंतिम सामने कधी होणार याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली होती. आता त्यांच्यासाठी अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल 2022 च्या प्ले-ऑफ्सचे सामने कुठे होणार आहे ते जाहीर केले आहे. यासोबतच आनंदाची बातमी अशी की, आयपीएलच्या 15व्या हंगामातील प्लेऑफ्सच्या सामन्यात 100 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती देखील असणार आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल 2022 च्या प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाणाची घोषणा केली आहे. हे सामने कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
आयपीएल-2022 प्ले-ऑफ्स, अंतिम सामन्यांचं वेळापत्रक
आयपीएल 2022: प्ले-ऑफ्सचा पहिला सामना 24 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर होणार आहे.
एलीमिनेटर सामना 26 मे रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर होणार आहे.
प्ले-ऑफ्समधील दुसरा सामना 27 मे ला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
आयपीएल 2022 चा अंतिम सामनासुद्धा 29 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.