ठाण्यातील नाशिक- मुंबई महामार्गावर तीन हात नाका येथे एका स्कूल बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची दुर्घटना आज (दि.२५) दुपारी घडली. या बसमध्ये पहिली ते तिसरीत शिकणारी १६ विद्यार्थी हाेते. बसचे चालक, क्लिनर व मदतनीस असे एकूण १८ जण या बसमध्ये अडकले होते
, ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून हाकेच्या अंतरावरच वाहतूक पोलीस टीम कर्तव्यावर होती. वाहतूक पोलिसांनी ही बस त्वरित खाली करून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर वाहतुक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ फायर दलाच्या मदतीने आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. एरोली येथील न्यू हॅारीझॅान पब्लिक स्कुलची ही बस होती. बसच्या इंजिनमध्ये शॅार्टसर्किंट झाल्याने ही आग लागली असावी, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली.
स्कूल बसला आग ; वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नाने टळला अनर्थ
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -