Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रमहिलेवर चाकूने वार करून सोन्याचा ऐवज लुटला

महिलेवर चाकूने वार करून सोन्याचा ऐवज लुटला

घराची खिडकी उघडून लाकडाने दरवाज्याच्या आतील कडी उघडून पाच जणांनी महिलेवर चाकूने वार केले. त्यानंतर महिलेचा गळा दाबून तिच्या कानातील व गळ्यातील दागिने ओरबडून १ तोळे सोन्याचा ऐवज लांबवला. उरुळी कांचन पांढरस्थळ वस्तीवर रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. दरोडेखोरांच्या हल्यात महिलेच्या हातावर गंभीर दुखापत झाली आहे. तर अन्य एका ठिकाणी या दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला.

बेबी महादेव उर्फ बळी कांचन (वय ४६, रा. पांढरस्थळवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमी झालेल्या महिलेचे नांव आहे. महादेव कांचन (वय ५२) यांच्या राहत्या घरात मध्यरात्री पाच जणांनी हा दरोडा टाकला. खिडकी उघडून लाकडाच्या साह्याने स्वयंपाक घरात प्रवेश केला. स्वयंपाक घरात आतील बाजूच्या खोलीत बेबी व बळी कांचन हे दाम्पत्य झोपी गेले होते. दरोडेखोरांनी या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून घरातील साहित्यांची उलथापालथ केली. घरात पैसे तसेच दागिने आहेत का? अशी विचारणा करुन दाम्पत्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, दरोडेखोरांच्या हाती काही न लागल्याने बेबी कांचन यांना चाकू दाखवून कानातील व गळ्यातील दागिने ओरबडून पळ काढला आहे. या झटापटीत महिलेच्या दोन्ही हातावर चाकूचे वार झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने दरोडेखोर पसार झाले. घटनास्थळी परिमंडळ ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहाय्यक आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण धायगुडे, उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड आदींनी येऊन पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -