‘पुष्पा दी राईज’.. या वर्षीचा पहिला ‘ब्लाॅक बस्टर’ सिनेमा.. या चित्रपटाने साऱ्या देशाला वेड लावलं.. चित्रपटातील गाण्यांवर आबालवृद्धांनी ठेका धरला… साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन व नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा हा चित्रपट रिलीज होऊन आता बराच काळ लोटलाय… मात्र, आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.
चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर निर्मात्यांनी लगेच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांना आता दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.
‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर है मैं है.. झुकेगा नही साला..’ असं म्हणत दाढीखालून हात फिरवणाऱ्या ‘पुष्पा’च्या ‘स्टाईल’चे कित्येक दिवाने झाले. तेलगू चित्रपटाचा नायक ‘पुष्पाराज’ला हिंदीतील आवाज श्रेयस तळपदे याने दिलाय. तेलगूप्रमाणेच हिंदीतील डायलाॅगही श्रेयसने तितक्याच ताकदीने म्हटले आहेत. त्यामुळे हिंदीतही हा चित्रपट जोरात चालला..
‘पुष्पा’ चित्रपटातील हे जबरदस्त डायलाॅग लिहिलेत, श्रीकांत विसा यांनी.. ‘पुष्पा: द रुल’ या दुसऱ्या भागाच्या संवादांवर सध्या ते काम करीत आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भागही अधिक चांगला बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी नुकतेच मोठे खुलासे केले.
‘पुष्पा’मधील संवाद इतके सुपरहिट होतील, असं वाटलं होतं का, या प्रश्नावर श्रीकांत विसा म्हणाले, की “खरं तर हे सारं अनपेक्षित होतं. चित्रपटातील हे डायलॉग एवढा मोठा पल्ला गाठतील, असं कधी वाटलं नाही.. चित्रपटातील बहुतेक संवादांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. ‘पुष्पा-2’मध्येही आम्ही असेच आणखी उत्तम संवाद घेऊन येत आहोत…”
“अल्लू अर्जुनसाठी ‘पुष्पा-2’मध्ये खास ‘सिग्नेचर डायलॉग्स’ असतील.. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. ‘पुष्पा-2’मध्ये तुम्हाला नक्कीच जबरदस्त संवाद ऐकायला मिळतील..,” असे ते म्हणाले.