केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅसच्या वाढविलेल्या किमतीविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी (दि. 27) सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेल, गॅस खरेदी-विक्री एक तासासाठी बंद ठेवून देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल- डिझेलच्या किमतीसह गॅस, खाद्यतेल, अन्नधान्य, भाजीपाला या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वेगाने वाढले आहेत. 2014 ते 2022 या कालखंडात राज्य सरकारांच्या करांत फक्त 35 टक्के वाढ झाली, पेट्रोल-डिझेलवरील केंद्र सरकारच्या करांमध्ये ताबडतोब 50 टक्के कपात करावी, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमती 500 रुपयांपर्यंत खाली आणाव्या, या मागण्यांसाठी बुधवारी (दि.27) सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेल, गॅस खरेदी-विक्री एक तासासाठी बंद ठेवण्याच्या देशव्यापी सत्याग्रहात पेट्रोल-डिझेल, गॅस वितरकांनी सहभागी होण्याचे आवाहन माकपचे डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, अॅड. वसुधा कराड, अॅड. तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, दगडू व्हडगर, संतोष काकडे, एकनाथ इंगळे यांनी केले आहे.