Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगअक्षय्य तृतीयेला घरबसल्या करा सोन्याची खरेदी; कसे ते जाणून घ्या

अक्षय्य तृतीयेला घरबसल्या करा सोन्याची खरेदी; कसे ते जाणून घ्या

भारतीय लोकांना सोन्याची खूप आवड असून सोन्याला एक विशेष महत्व आहे. अनेक सणांमध्ये सोने खरेदी केले जाते. सोने हे प्रगतीचे लक्षण मानले जाते. भारतात साडे तीन मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अशा साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीया आता लवकरच येणार आहे. आता अक्षय तृतीयाला ऑनलाईन पद्धतीने देखील सोने खरेदी करता येईल.

या सोन्याला डिजिटल गोल्ड असे म्हटले जाते. हे डिजिटल गोल्ड आपण सोन्याची बिस्किटे, गोल्ड कॉईन्स, ब्रिक या स्वरूपात खरेदी करू शकाल. अशा प्रकारचे डिजिटल गोल्ड आपण पेटीएम मनी, जीपे, फोनपे, एचडीएफसी सिक्योरिटीज किंवा इतर प्लॅटफॉर्म वरूनही खरेदी करू शकाल. हे 24 कॅरेट म्हणजेच 999.9 शुद्ध सोने असते. हे सोने एमएमटीसी-पीएएमपी कडून प्रमाणित केले जाते.

ऑनलाइन सोने खरेदी करण्याची पद्धत

आपल्याला गूगल पे वर जाऊन गोल्ड लॉकर ऑप्शन सर्च करावे लागेल. आता गोल्ड लॉकर वर क्लिक करा. यानंतर खरेदी करा वर क्लिक करा. या मधील सोन्याचे दर आपल्या शहरातील किंमती नुसार बदलतील. आपण खरेदी सुरु करताच पुढील पाच मिनिटांपर्यंत आपल्याला तोच दर दिसेल जो सुरुवातीला दिसला होता. मात्र पाच मिनिटांनंतर तो बदलला जाईल. यानंतर भारतीय रुपयांमध्ये आपल्याला किती रुपयांचे सोने खरेदी करायचे आहे ते लिहा. आता पेमेंट करा. यानंतर आपल्याला सोने मिळेल. हे सोने गूगल पेच्या गोल्ड लॉकर मध्ये स्टोर केले जाईल.

आपण खरेदी केलेले हे सोने एमएमटीसीपीएएमपी कडून मॅनेज केले जाते. ते फिसिकल स्वरूपात सोने आपल्याकडे ठेवतात आणि त्याची पूर्ण गॅरेंटी देतात. येथे आपल्याला गोल्ड लॉकरची सुविधा देखील मिळेल. इथे तुम्हांला सोन्याच्या संदर्भातील सर्व माहिती मिळेल. इथे आपण सोने खरेदी अथवा त्याची विक्रीही करू शकाल. तसेच आपण खरेदी केलेलं सोने एमएमटीसीपीएएमपीला देखील विकता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -