लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर कारमध्ये गैंगरेप करुन तिची हत्या करत मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना जयपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. मयत महिला 23 एप्रिल रोजी जगतपुर रहिवासी असून दौसातील गोपालपुरा गावात आपल्या माहेरी चालली होती. बस्सीपर्यंत ही महिला आपल्या ओळखीच्या व्यक्तीसह मोटारसायकलवर आली. त्यानंतर महिला बसमध्ये बसून रामगड पाचवाडा येथील सोनद बसस्थानकावर पोहोचली. मात्र बसस्थानकापासून महिलेचे माहेर सुमारे 7 किलोमीटर असून वाहतुकीचे कोणतेही साधन नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कार चालकाने या महिलेला आणि एका मुलाला लिफ्ट दिली.
सदर मुलगा काही अंतरावर उतरला. मात्र महिलेचे गाव पुढे होते. यानंतर नराधमांनी महिलेवर गँगरेप केला. गँगरेपनंतर आरोपी महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गाडीत ठेवून 3 ते 4 तास फिरत होते. महिला दुसऱ्या दिवसापर्यंत घरी न पोहचल्यामुळे नातेवाईकांनी 24 एप्रिलला रामगढ पचवारा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्याआधारे पोलिसांनी एका आरोपीला अटक केले. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आला असून अन्य 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे.
गँगरेप आणि हत्येनंतर महिलेचा मृतदेह आरोपींनी बस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विहिरीत टाकल्याचे सांगितले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आरोपींसह घटनास्थळी पोहोचले आणि तुंगा आणि बस्सी पोलीस ठाण्याच्या मदतीने महि. मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. संपूर्ण प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी आणि नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी नातेवाईकांनी धरणे आंदोलन केले. दौसा जिल्हा रुग्णालयाबाहेरील रस्त्यावर चक्का जाम केला. मात्र पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत प्रकरण शांत केले. त्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.