Sunday, July 6, 2025
Homeतंत्रज्ञानव्हॉटस् अ‍ॅप व्हॉईस कॉलवर कनेक्ट होतील 32 लोक!

व्हॉटस् अ‍ॅप व्हॉईस कॉलवर कनेक्ट होतील 32 लोक!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

व्हॉटस् अ‍ॅप कडून सतत नवे नवे फीचर्स आणले जात असतात. आताही व्हॉटस् अ‍ॅपने यूजर्सना खूश करणारे एक नवे फीचर आणले आहे. यानुसार वापरकर्त्यांना व्हॉईस कॉल अंतर्गत एकाच वेळी 32 लोकांना कनेक्ट करता येणार आहे. यापूर्वी व्हाईस कॉलवर केवळ 8 लोक कनेक्ट होऊ शकत होते; पण आता त्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे.


हे फीचर अँड्रॉईड आणि अ‍ॅपल आयओएससाठी तयार केले गेले आहे. कोरोना काळात व्हॉटस् अ‍ॅपने ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगची मर्यादा आठपर्यंत वाढवली होती. मात्र, आता केवळ व्हाईस कॉलवर 32 लोक कनेक्ट करू शकणार आहेत. गुगल अँड्रॉईड आणि अ‍ॅपल आयओएसवर रोलआऊट होत आहे. व्हॉटस् अ‍ॅपवर एफएक्यू नवीन मर्यादेसह अपडेट केले गेले आहे.

अपडेटेड एफएक्यू विभागात असे नमूद केले आहे की व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप कॉलिंग वापरून 32 लोकांना एकमेकांशी विनामूल्य व्हॉईस कॉल करता येईल. अ‍ॅपल वापरकर्तेही नवीन कॉल मर्यादेचा वापर करू शकतात. एका व्हॉईस कॉलवर 32 लोकांना जोडण्यासाठी नवीन डिझाईन सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये सोशल ऑडिओ लेआऊट, स्पीकर हायलाईटस् आणि वेवफॉर्म्ससह अपडेटेड इंटरफेस मिळतो.

यामध्ये तुम्ही पूर्वीप्रमाणेच एक सामान्य व्हाईस कॉल कराल आणि नंतर इतर वापरकर्त्यांचा कॉल उचलल्यानंतर तुम्ही वरच्या बाजूला दिसाल. अ‍ॅड पर्यायावर क्‍लिक करून तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेल्या नंबरला किंवा तुम्ही व्हॉटस् अ‍ॅपवर चॅट केलेल्या लोकांना कॉल करू शकाल. अशा प्रकारे तुम्ही व्हॉईस कॉलवर एकाच वेळी 32 लोकांना कनेक्ट करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -