Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगमहाराष्ट्रात ‘या’ महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता; मास्कसक्तीवर आज निर्णय?

महाराष्ट्रात ‘या’ महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता; मास्कसक्तीवर आज निर्णय?

कोरोना रुग्णांचे प्रमाण मागच्या 2 महिन्यात कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. जनजीवन पूर्वपदावर आल्यासारखे वातावरण महाराष्ट्रात होते. मात्र अशातच आता पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे कारण कर्नाटक, हरियाना, दिल्ली अशा राज्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढतान दिसत आहे. अशातच ज्या 5 राज्यांना कोरोना अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यात महाराष्ट्रही आहे.

अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्यात पुन्हा मास्कसक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.  या बैठकीत बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे करावे अशी भूमिका टास्क फोर्स ने मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये.

येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला करोनाची सौम्य लाट येण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. आता या बैठकीनंतर मास्कसक्ती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. करोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेत मास्कचा वापर आवश्यकच असून किमान बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करावे, असे टास्क फोर्स सदस्यांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -