Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगतिचा फोटो व्हाट्सअप स्टेट्सला ठेवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

तिचा फोटो व्हाट्सअप स्टेट्सला ठेवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

अनेक प्रेमाचे हटके किस्से हे नेहमीच समोर येत असतात. काही लोक समोरच्या व्यक्तीने नकार दिला किंवा प्रेमात अपयश आले कि टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये एका लव्ह स्टोरीचा भयंकर अंत झाला आहे. एका तरुणाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे.

मृत्यूपूर्वी प्रियकराने प्रेयसीचा फोटो Whatsappस्टेटसवर अपलोड केला होता. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,

राजस्थानमधील एका १९ वर्षीय मुलाने आपल्या प्रेयसीवर नाराज होऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी त्याने Whatsappस्टेटसवर प्रेयसीचा फोटो अपलोड केला होता. मी हिच्यासाठी मरत आहे, असे सांगितले होते.

यानंतर काही वेळाने प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला.यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. जीवराजगडमध्ये राहणाऱ्या अर्जुनने रात्री उशिरा घराजवळील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अर्जुनने मृत्यूपूर्वी प्रेयसीचा फोटो Whatsappस्टेटसवर ठेवला आणि कॅप्शनमध्ये लिहिले कि, मी हिच्यासाठी आत्महत्या करत आहे.

मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारावर तपास सुरु आहे. यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -