Saturday, July 26, 2025
Homeतंत्रज्ञानव्हॉट्सॲप वापरत असाल, तर ‘ही’ बातमी तुमच्यासाठी; व्हॉट्सॲप देणार तुम्हाला पैसे..??

व्हॉट्सॲप वापरत असाल, तर ‘ही’ बातमी तुमच्यासाठी; व्हॉट्सॲप देणार तुम्हाला पैसे..??

जगभरात प्रसिद्ध असणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप (WhatsApp) आता काही दिवसांतच आपल्या युजर्सना पैसे देणार आहे. म्हणजेच जर तुम्हीही व्हॉट्सॲप वापरात असाल तर तुम्हाला व्हॉट्सॲप पैसे देणार आहे. येत्या काही आठवड्यांत व्हॉट्सॲप आपली व्हॉट्सॲप पेमेंट ही सेवा वाढवण्यासाठी एक सेवा सुरु करणार असल्याची माहिती आहे. कंपनी अनेक दिवसांपासून या फीचरची टेस्टिंग करत होती.

एका न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, भारतातील यूजर्सला व्हॉट्सॲप पेमेंट सेवा देऊन ती अधिक सक्षम बनविण्यासाठी कॅशबॅक स्कीम व्हॉट्सॲप ला पेमेंट सेवेची मंजूर मिळाल्यानंतर भारतीय युजर्ससाठी जारी करणार असल्याची माहिती आली होती. अहवालात म्हटलंय की, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप यंदाच्या वर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत कॅशबॅक ऑफर लाँच करू शकते. यामध्ये व्हॉट्सॲप यूजर्सना व्हॉट्सॲप पेमेंट सेवेच्या माध्यमातून जर एखाद्या युजरला पैसे ट्रान्सफर केले तर त्या युजरला 33 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच, यासाठी तुम्हाला WhatsApp UPI सेवा वापरून फंड ट्रान्सफर करावा लागेल.

व्हॉट्सॲप पेमेंट सर्व्हिसचा वापर करून युजर्स आपल्या व्हॉट्सॲपवरील इतर संपर्कांना म्हणजेच तुमच्या व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट्सना व्हॉट्सॲपद्वारे पैसे पाठवू शकतात. कंपनीच्या योजनेची माहिती असलेल्या एका स्रोताकडून ही माहिती आली आहे. व्हॉट्सॲप आपल्या युजर्सला पेमेंट सर्व्हिस वापर करण्यासाठी अधिक आकर्षित करणार आहे जेणेकरून या सर्व्हिसचा लोक अधिकाधिक फायदा घेतील. व्हॉट्सॲप कॅशबॅक ऑफरचा लाभ हा व्हॉट्सॲपद्वारे केलेल्या तीन ट्रान्सफरपर्यंत देईल. पण ट्रान्सफर केल्या जाणार्‍या रकमेत फरक पडणार नाही. म्हणजेच, जर युजर्संनी 1 रुपया देखील ट्रान्सफर केला तर त्यांना हा कॅशबॅक मिळणार आहे, असं म्हटलं आहे.

काउंटरपॉईंट रिसर्चचे  उपाध्यक्ष नील शाह म्हणाले की, व्हॉट्सॲप ची कॅशबॅक अमाऊंट खूपच कमी वाटेल. मात्र ते युजर्संना व्हॉट्सॲप पेमेंट सेवा वापरण्यासाठी नक्कीच आकर्षित करेल. एक भारतीय युजर्स म्हणून, तुम्हाला मिळणारे पैसे तुम्ही सोडू इच्छित नाही. या निवेदनात, व्हॉट्सॲपने सांगितले की कॅशबॅक ऑफर टप्प्याटप्प्याने जारी केली जाईल. यामुळे युजर्सला व्हॉट्सॲप पेमेंटच्या पोटेंशियलला अनलॉक करण्यास मदत करेल. यानंतर Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या पेमेंट ॲप्सशी , व्हॉट्सॲप ची जोरदार चुरस असणार आहे, हे नक्कीच दिसेल. आता Google Pay आणि PhonePe सारख्या बड्या पेमेंट ॲप्सला टक्कर देण्यासाठी WhatsApp Payment cashback वर लवकरच कॅशबॅक ऑफर केला जाऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -