Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रपोहण्यासाठी गेलेल्या मुलीचा नदीत बुडून  मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या मुलीचा नदीत बुडून  मृत्यू

मैत्रिणींसोबत वर्ये, ता. सातारा येथील वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या कस्तुरी विजय निकम (वय 13, रा. वर्ये, ता. सातारा) या शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, कस्तुरी निकम आणि तिच्या चार मैत्रिणी वर्येमधील वेण्णा नदीच्या निकम आळीतील डोहात पोहण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास या नदीच्या कडेला काही महिला देखील कपडे धूत होत्या. त्यावेळी कस्तुरी ही डोहात पोहत असताना अचानक बुडाली. हा प्रकार तिच्या मैत्रिणींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. मुलगी बुडत असल्याचे पाहून कपडे धुणार्‍या महिलांनीही आरडाओरड करून गावातील लोकांना  बोलावून आणले. दहा ते बारा ग्रामस्थांनी डोहामध्ये उडी मारुन कस्तुरीचा शोध घेतला. त्यावेळी ती डोहाच्या तळाला सापडली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे वर्ये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, कस्तुरी सातवीमध्ये शिकत होती. तिचे आई-वडील मोलमजुरी करतात. तिला आणखी एक मोठी बहीण आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -