एस.टी. बसमध्ये वाद झाल्याने एका मद्यधुंद प्रवाशाने वाहक नजीर मुजावर (रा. आष्टा) यांच्या डोक्यात जेवणाचा डबा घालून त्यांना जखमी केले. हा प्रकार इस्लामपूर-कोडोली बसमध्ये गुरूवारी दुपारी घडला. याप्रकरणी पोलिसांनी किरण सुधाकर कांबळे (रा. इस्लामपूर) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इस्लामपूर आगाराची इस्लामपूर- कोडोली बस येथील दत्त टेकडीजवळ आली असता वाहक मुजावर व प्रवासी कांबळे यांच्यात वाद झाला. यावेळी मद्यधुंद असलेल्या कांबळे याने हातातील डबा त्यांच्या डोक्यात घातला. यामध्ये मुजावर यांच्या डोक्याला जखम झाली. त्यामुळे चालकाने बस इस्लामपूर पोलिस ठाण्यात आणली. येथे पोलिसांनी कांबळे याला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -