Monday, July 28, 2025
Homeमनोरंजनआज ‘हे’ धमाकेदार चित्रपट रिलीज होणार, ॲक्शनचाही असेल तडका, पाहा कोणते असतील...

आज ‘हे’ धमाकेदार चित्रपट रिलीज होणार, ॲक्शनचाही असेल तडका, पाहा कोणते असतील ‘ते’ चित्रपट

कोरोनाचे निर्बंध संपले असले तरी काही महिन्यांपूर्वी जेव्हा चित्रपटगृहे बंद होती तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मने चांगली प्रसिद्धी मिळवली. कारण लोंकांना घरबसल्या सिनेमा पाहण्याचा आस्वाद घेता आला. त्यामुळेच आता अनेक जण या प्लॅटफॉर्मवर सदस्यत्व घेऊन अगदी कमी दरात अनेक सिनेमांची मजा लुटतात. बऱ्याच महिन्यानंतर चित्रपटगृहे पूर्णपणे उघडली असून तुम्ही आता पुन्हा चित्रपटांचा आनंद घ्यायला तयार झाला आहेत. जाणून घेऊ कोणते चित्रपट आज रिलीज होणार आहेत.

आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कारण आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा काहींना चित्रपट पाहायला चित्रपटगृह्यामध्ये जायला जमले नाही. त्यांच्यासाठी हा सिनेमा 26 एप्रिललाच रिलीज झाला आहे. त्यामुळे आता आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

अनेक धमाकेदार चित्रपट घेऊन येतानाच आता अक्षय कुमारचा बच्चन पांडेनंतर आणखी एक चित्रपट येणार असून त्याचे नाव ‘मिशन सिंड्रेला’ आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा सिनेमा आज 29 एप्रिलला रिलीज होत आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत रकुलप्रीत सिंगही मुख्य भूमिकेत आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्रीने आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवत अनेक चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारून धमाका केला आहे. अशा तापसी पन्नूने ‘मिशन इम्पॉसिबल’ नावाचा आगामी चित्रपट केला आहे. हा सिनेमा 29 एप्रिलला रिलीज होणार आहे. हा एक तेलुगु चित्रपट आहे, ज्यामध्ये तापसीसोबत भानू प्रकाशन, हर्ष रोशन इत्यादी कलाकार असून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात कॉमेडीसोबतच तापसीचे मुलांसोबतचे अनोखे नाते दाखवण्यात येणार आहे.

आज एकापाठोपाठ एक असे चित्रपट रिलीज होताना दिसणार आहेत. यात आता आणखी एक भर म्हणून 29 एप्रिल रोजी, जर तुमच्याकडे सदस्यता असेल तर OTT वर नेव्हर किस युवर बेस्ट फ्रेंड देखील तुम्ही आज पाहू शकता. कारण ही एक वेब सिरीज आहे, जी आज रिलीज होत आहे. ज्यामध्ये दोन मित्रांची अनोखी कहाणी दाखवण्यात आली आहे. ही वेबसीरिज Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.

अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी बनविलेल्या बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi Movie) या सिनेमाची राज्यभर चांगलीच चर्चा आहे. अखेर मराठी रसिकांची ही उत्सुकता आज संपणार असून चंद्रमुखी सिनेमा आज रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)आणि आदिनाथ कोठारे (Addinath Kothare) यांचा सुरेख अभिनय प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकतील असा विश्वास व्यक्त केला जातोय.

अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘रनवे 34’ (Runway 34) हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. आज शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहांत धडकणार आहे. अजय, अमिताभ बच्चन, रकुलप्रीत सिंग अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. 2015 साली खराब हवामान आणि अगदी कमी दृश्यमानता असताना पायलटने जोखित पत्करत हे विमान विमानतळावर उतरवलं होतं. अशा लँडिंगला ब्लाइंड लँडिंग म्हणतात. या लँडिंगमध्ये सुमारे 150 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. असं कथानक आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हिरोपंती 2 या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर गेल्या शनिवारी रिलीज झाला. या चित्रपटात टायगर श्रॉफ बबलूच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात टायगर आणि तारा सुतारिया शिवाय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट आज 29 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -