Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगपुन्हा एकदा महागाईने दिला झटका; दैनंदिन वापरात येणाऱ्या ‘त्या’ वस्तूच्या दरात झाली...

पुन्हा एकदा महागाईने दिला झटका; दैनंदिन वापरात येणाऱ्या ‘त्या’ वस्तूच्या दरात झाली वाढ

महागाईने लोकांना नको नको केले आहेत. पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, दूध, तेल, डाळी व इतर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या बहुतांशी वस्तू महागल्या आहेत. महागाईचा झटका या न त्या कारणाने लोकांना बसतच आहे. अशातच एक खिशाला झळ देणारी बातमी समोर आली आहे. CNG गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

गेल्या 2 महिन्यात जवळजवळ 3 वेळा CNG गॅसचे दर वाढले आहेत. CNG स्वस्त आहे आणि मायलेज पण जबरदस्त मिळते, असे म्हणून ज्या ग्राहकांनी CNG गाड्या घेतल्या, त्यांनी आता डोक्याला हात लावून घेतला आहे. आज झालेली वाढ ही 2 रुपये 20 पैसे प्रति किलो इतकी होती. यामुळे आता पुण्यात सीएनजीचा दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलो इतका झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांत CNG गॅस दरात झालेली एकूण वाढ बघता आता ‘महंगाई डायन खाये जात है’, अशी परिस्थिती CNG वाहन मालकांची आहे. यापूर्वी सीएनजीचा दर 68 रुपये इतका होता मात्र, पाच रुपयांनी वाढ झाल्याने हा दर 73 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा दोन रुपयांची वाढ होऊन हा दर 75 रुपयांवर पोहोचला आणि आता पुन्हा एकदा 2 रुपये 20 पैशांनी वाढ झाल्याने सीएनजीचा दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलो इतका झाला आहे.

काय आहेत दर वाढण्याची कारणे :-

देशांतर्गत उत्पादित गॅस भारतीय ग्राहकांच्या मागणीसाठी पुरेसा नाही.
रशिया युक्रेन युद्धात कुणी कुणाला पाठिंबा द्यायचा, यावर बरीच खलबते झाली. मात्र एवढं सगळं झाल्यावर रशियाने गॅस पुरवठा बंद केला. आता गॅस अजून महाग होऊन 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
जोपर्यंत रशियन आणि युक्रेन युद्ध संपत नाही तोपर्यंत किंमती कपातीच्या अपेक्षा करू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -