Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : महिला प्रवाशांसाठी के.एम.टी.च्या विशेष बससेवेचा' प्रारंभ

कोल्हापूर : महिला प्रवाशांसाठी के.एम.टी.च्या विशेष बससेवेचा’ प्रारंभ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महानगरपालिका परिवहन (के.एम.टी.) उपक्रमामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरदार व नियमित प्रवास करणाऱ्या महिलांकरितां विशेष बस सेवेचा प्रारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांचे हस्ते व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू स्टेडियम येथून करण्यात आला.




जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका उपआयुक्त रविकांत आडसुळ, अति.परिवहन व्यवस्थापक मंगेश गुरव, सहा.आयुक्त विनायक औंधकर इ. मान्यवर उपस्थित होते. बस शालेय / महाविद्यालयीन महिला विद्यार्थीनी, महिला कर्मचारी तसेच अन्य महिला वर्गासाठी शाहू मैदान येथून आर.के.नगर – जिल्हा परिषद मार्गे शुगरमिल व परत शुगरमिल येथून मार्गस्थ होऊन जिल्हा परिषद – आर.के.नगर मार्गे शाहू मैदान पर्यंत धावणार आहे. धांवेल. या बसमधून महिला प्रवाशांसोबत असणाऱ्या 3 ते 12 वया पर्यंतच्या लहान मुलांना प्रवास करता येईल. या विशेष बस सेवचा लाभ अधिकाधिक महिला प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -