Tuesday, July 8, 2025
Homeआरोग्यCorona in Maharashtra: राज्यात पुन्हा लागू होऊ शकतो हा नियम, वाचा काय...

Corona in Maharashtra: राज्यात पुन्हा लागू होऊ शकतो हा नियम, वाचा काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशातील अनेक भागांमध्ये कोरोना विषाणूचे (Corona Virus) रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा मास्क लावण्याचा नियम लागू केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले की “राज्यात सध्या मास्क अनिवार्य (Corona in india) करण्याची गरज नाही. मात्र कोविड-19 च्या (Covid-19) नवीन रुग्णांमध्ये वाढ झाल्यास मास्क घालण्याचा नियम सक्तीचा (Masks Mandatory) केला जाऊ शकतो”. औरंगाबाद येथे टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्यात गेल्या 24 तासात कोविड-19 च्या 155 नव्या रुग्णांची नोद झाली आहे.



राजेश टोपे म्हणाले “देशातील काही भागात संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत आणि ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सध्या राज्यात निर्बंधांची गरज नाही. परंतु प्रकरणे वाढल्यास आम्हाला निर्बंध लादावे लागतील आणि मास्क घालणे अनिवार्य करावे लागेल”.

टोपे म्हणाले की “राज्य सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला 12-14 आणि 15-17 वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांच्या कोविड-19 लसीकरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आता शाळा बंद असल्याने यात काही आव्हाने आहेत. 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी केंद्र सरकारने कोणताही प्रोटोकॉल जारी केला असेल तर आम्ही त्याची जलद गतीने अंमलबजावणी करू”. तसेच “कोविड-19 लसीकरण अनिवार्य नसले तरी लोकांना लसीकरणाचे फायदे दाखवून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे लागेल”, असेही राजेश टोपे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -