Saturday, February 21, 2026
Homeबिजनेसशेअर बाजारात पुन्हा मंदी, कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला

शेअर बाजारात पुन्हा मंदी, कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला

आज सोमवारी शेअर बाजार खुला होताच त्यात घसरण दिसून आली. सकाळी बाजार सुरु होताच बीएसई सेन्सेक्स (Sensex) सुमारे ५०० अंकांनी घसरला. निफ्टीही (Nifty) खाली आला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सकाळी बाजारात खुला होताच सेन्सेक्स ५७७ अंकांनी घसरून ५६,४८३ वर तर निफ्टी १७८ अंकांनी घसरून १६,९२४ वर आला. टॉप लुजर्समध्ये बजाज, इन्फोसिस, अशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक यांचा समावेश होता.

NSE वर उपलब्ध तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) २९ एप्रिल रोजी ३,६४८.३० कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) ३,४९० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -