Friday, August 1, 2025
HomeसांगलीSangali : सांगलीत तरुणीचा विनयभंग ; दोघे ताब्यात

Sangali : सांगलीत तरुणीचा विनयभंग ; दोघे ताब्यात

उदगाव (ता. शिरोळ) येथील एका तरुणीचा भरदिवसा विनयभंग करण्यात आला. राममंदिर कॉर्नरवर सोमवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. किरण महावीर चौगुले (वय 29) व किर्तीकुमार यल्लाप्पा चौगुले (24, दोघे रा. शिरटी, ता. शिरोळ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

पीडित तरुणी सोमवारी आईसोबत सांगलीत येत होती. राम मंदिर कॉर्नरवर त्या थांबल्या होत्या. संशयित तिथेही आले. एकाने चिठ्ठी तरुणीकडे फेकली. आईने हा प्रकार पाहून चिठ्ठी उचलून पाहिली. यामध्ये मोबाईल क्रमांक होता. आईने पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर संपर्क साधून याची माहिती दिली. दोन पोलिस तातडीने आले. संशयितांना ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -