Friday, August 1, 2025
Homeसांगलीसांगली : झोपेत सर्पदंश होऊन तरुणाचा मृत्यू

सांगली : झोपेत सर्पदंश होऊन तरुणाचा मृत्यू

उटगी (ता.जत) येथील एका तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शिवानंद निंगाप्पा बिराजदार (वय २५) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.२) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती चंद्राम विठ्ठल बिराजदार यांनी उमदी पोलिसांत दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उटकी येथील बिराजदार कुटुंबीयांचे घर रानात आहे. रविवारी रात्री सर्वजण झोपी गेले होते. दरम्यान, सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शिवानंद बिराजदार हे झोपेत असतानाच सापाने चावा घेतला. यानंतर त्यांना उपचारासाठी जत येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद उमदी पोलिसांत झाली असून अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -