Tuesday, February 24, 2026
Homeमनोरंजनविकी-कॅटरिना : विकीने केले तोंड भरून कौतुक

विकी-कॅटरिना : विकीने केले तोंड भरून कौतुक

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे एक बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. या दोघांनी विवाहापूर्वी आपल्या रिलेशनबद्दल कधीच काही सांगितले नाही. विवाहानंतरही ते एकमेकांबद्दल जास्त काही बोलत नाहीत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेम व्यक्‍त करत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने कॅटरिनाचे तोंड भरून कौतुक केले.

विकी म्हणतो की, आपल्या जीवनावरही कॅटरिनाचा मोठा प्रभाव आहे. ती खरोखरंच फारच हुशार आहे. मी नशिबवान असल्यानेच कॅट माझ्या जीवनात आली. विकीच्या या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विकी व कॅटरिनाचा 9 डिसेंबर 2021 रोजी विवाह पार पडला होता. दोहोंच्या वर्कफ्रंटचा विचार करावयाचा झाल्यास विकी आता लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सारा अली खान आहे. तर कॅटरिनाही सलमान खानच्या ‘टायगर-3’ मध्ये दिसणार आहे. तसेच तिच्याकडे ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपटही आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -