काही दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय तरुणी सोनम शुक्लचा वर्सेवा भागातील एका नाल्यात आढळून आला होता. या प्रकरणी कोणताही पुरावा नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे गोरेगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
मृत सोनम शुक्ला ही तरुणी 25 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता ट्युशनला जाण्यासाठी आपल्या घरातून निघाली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. सोनम शुक्ला ही गोरेगाव पश्चिम भागातील प्रेमनगर भागात राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम ट्युशनला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर निघाली होती पण ती ट्युशनला गेली नव्हती. रात्री 9 वाजेच्या सुमारास निघण्याआधी ती आपल्या एका मैत्रिणीच्या मित्राच्या घरी गेली होती. यादरम्यान सोनम रात्री 9.30 वाजले तरी घरी न आल्यामुळे तिच्या घरचे काळजीत पडले होते. यादरम्यान सोनमच्या वडिलांनी तिला फोन केला होता त्यावेळी सोनमने आपण लवकरच घरी येणार आहे, मी सध्या माझ्या मित्राच्या घरी आहे, असे आपल्या वडिलांना सांगितले होते. मात्र रात्री 11.30 वाजले तरी सोनम घरी आली नाही म्हणून तिच्या वडिलांनी तिला पुन्हा कॉल केला पण तेव्हा फोन बंद आला.
मोहम्मद अन्सारी यांच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीचे आई-वडील घरी नव्हते. सोनम आणि आरोपी अन्सारी हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते. यावेळी त्याच्या घरी वाद झाला होता. याच वादातून आरोपी अन्सारीने सोनमला घरी बोलावून तारेच्या वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने सोनमचे हात पाय बांधून तिचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि हे पोते मालाड पश्चिमच्या नाल्यात टाकून दिले होते. सोनमचा मृतदेह हा नाल्यातील मासे खाऊन टाकतील असा अंदाज आरोपीने बांधला होता.
तर दुसरीकडे आपली मुलगी घरी न आल्यामुळे ती बेपत्ता असल्याची तक्रार गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 28 एप्रिल रोजी सोनमचा छिन्नविछन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. तिचा मृतदेह हा वयॊवाच्या नाल्याच्या बाजूला आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह सोनमचा असल्याचे समोर आले.
यावेळी सोनमच्या वडिलांनी आरोपी मोहम्मद अन्सारीचा उल्लेख केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. यानंतर पोलिसांनी अन्सारीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.