Monday, July 28, 2025
HomeसांगलीSangli : दुकानाला लागलेल्या आगीत ८ गाळे आणि मोटरसायकली जळून खाक

Sangli : दुकानाला लागलेल्या आगीत ८ गाळे आणि मोटरसायकली जळून खाक

इस्लामपूर येथील पेठ रोडवरील दुकान गाळ्यांना शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ८ गाळे, मोटरसायकली जळून खाक झाल्या. ही दुर्घटना मंगळवारी (दि.०३) सकाळी नऊ वाजण्यास घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असल्याचेही म्हटले जात आहे.

इस्लामपूर – पेठ रस्त्यावर संभाजीनगर परिसरात असलेल्या गाळ्यांमधील जुन्या दुचाकी विक्रीच्या दुकानाला सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर या दुकानाला लागूनच असलेल्या बेकरी, कोल्ड्रिंक्स , चहावाला, हॉटेल्सलाही आग लागत गेली. या आगीत २० ते २५ दुचाकीसह या गाळ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप वेळ झाला होता. अक्षयतृतीय्या आणि ईदच्या दिवशीच ही दुर्घटना घडून व्य‍वसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -