Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीऊसतोडणी मजुरासह बालकाचे अपहरण; तिघांवर गुन्हा दाखल

ऊसतोडणी मजुरासह बालकाचे अपहरण; तिघांवर गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

ऊसतोडणी मजुरासह एका बालकाचे बीड जिल्ह्यातील व्यक्‍तींनी अपहरण केल्याची घटना 17 एप्रिल रोजी (रा. भाग्यनगर, ता. खानापूर) येथे घडली होती. याप्रकरणी मंगळवारी ऊसतोड मजूर कमल पिनू माळी (मूळ रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, जि. अहमदनगर, सध्या रा. भाग्यनगर, ता. खानापूर) यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे.


अनिल सहदेव सूर्यवंशी (वय 20) व विजय पिनू माळी (12) अशी अपहरण झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी हणमंत बापूराव बावळे, कल्याण बापूराव बावळे, बापूराव बावळे (तिघेही जि. बीड) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. कमल माळी या ऊसतोड मजूर आहेत. त्या सध्या भाग्यनगर येथे ऊसतोडणीसाठी आल्या आहेत. 17 एप्रिलला त्यांचा मुलगा विजय आणि भाचा अनिल माळी हे राहत असलेल्या झोपडीपासून थोड्या अंतरावर ट्रॅक्टर जोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयितांनी दोघांचे अपहरण केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -