सांगली येथील शामरावनगरमधील विठ्ठलनगरमध्ये राहणारे संतोष सहदेव सूर्यवंशी (वय 37) या शिक्षकाने गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. संतोष सूर्यवंशी यांचे मूळ गाव कवठेमहांकाळ आहे. ते वाळवा येथे एका संस्थेच्या शाळेत शिक्षक आहेत.
त्यांच्या पत्नी व आईही शिक्षिका आहेत. वडीलही शिक्षक होते. मंगळवारी त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यावेळी सूर्यवंशी कामानिमित्त बाहेर गेले. दुपारी दोन वाजता ते घरी आले. थोडा वेळ झोपतो, असे सांगून ते दुसर्याू मजल्यावरील खोलीत गेले. पत्नी दुपारी तीन वाजता त्यांना जेवन करण्यासाठी उठविण्यास गेल्या. त्यांना हाक मारली, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला.
त्यावेळी सूर्यवंशी यांचा मृतदेह गळफासाने लटकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी स्कार्पने छताच्या हुकाला गळफास घेतला होता. शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदन तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.