देशातील लोक बऱ्याच दिवसांपासून वाढत्या रिचार्ज प्लॅन्समुळे त्रस्त आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वच क्षेत्रांत आता दरवाढ पाहायला मिळत आहे. टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली असली तरी काही कंपन्यांनी दरवाढ करण्यासोबतच ठराविक jio recharge plans मध्ये काही फायदेही जास्त दिले आहेत. यामुळे जिओ ग्राहकांची पैशांची चांगली बचत होईल हे निश्चित आहे.
रिलायन्स जिओचा एक प्लॅन भलताच पॉप्युलर होत आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला Disney प्लस Hotstar सबस्क्रिप्शन अगदी फ्री मिळतेय. यासाठी तुम्हाला फक्त एक रिचार्ज केला की त्याचे फायदेखील जास्तच मिळणार आहे. या रिचार्ज अंतर्गत अमर्यादित डेटा, मोफत कॉलिंग, एसएमएस आणि इतर सुविधाही दिल्या जातील.
जाणून घ्या या आकर्षक प्लॅनविषयी..
Jioचे अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत, जे Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येतात. जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलीडीटी मिळत आहे. इंटरनेट वापरण्यासाठी या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 56 जीबी डेटा दररोज 2GB डेटा याप्रमाणे मिळणार आहे. दररोज 100 SMS मोफत मिळणार आहे. दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर तुमचा इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल.
प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला IPL चा आनंद घेण्यासाठी 1 वर्षाचे Disney Plus Hotstar सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळत आहे. हा रिचार्ज केला तर तुम्हाला Jio Apps जसे की, Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सदस्यत्व मिळेल. महत्वाचं म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी हा रिचार्ज चांगली भेट असणार आहे कारण त्यांना IPL मोफत पाहता येणार आहे. यासाठी त्यांना Jio चा 499 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागणार आहे.