Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगली : माणिकवाडी येथे विवाहितेची आत्महत्या

सांगली : माणिकवाडी येथे विवाहितेची आत्महत्या

माणिक वाडी (ता.वाळवा) येथील विवाहिता हर्षदा सागर आटकेकर (वय 22) हिने सासरच्या छळास कंटाळून विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. तिचे वडील नामदेव रामचंद्र शिंदे (रा. मांगरूळ, ता. शिराळा) यांनी पतीसह चौघांविरूद्ध कोकरूड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पती सागर जगन्नाथ आटकेकर, सासू कमल जगन्नाथ आटकेकर, जयदीप जगन्नाथ आटकेकर (रा. माणिकवाडी), नणंद सोनाली (रा.केदारवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मांगरूळ (ता. शिराळा) येथील हर्षदा हिचा माणिकवाडी (ता. वाळवा) येथील सागर जगन्नाथ आटकेकर याच्याशी विवाह झाला होता. पती सागर, सासू कमल, दीर जयदीप, नणंद सोनाली यांनी हर्षदा हिचा छळ सुरू केला होता. पती सागर हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे तिने विषारी द्रव प्राशन केले.उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याबाबत चोघांच्या विरोधात कोकरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -