Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रकंटेनर-रिक्षाचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

कंटेनर-रिक्षाचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारामध्ये नागपूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. कंटेनरने अॅतपे रिक्षाला जोरदार धडक दिली असून या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांसह चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारात भरधाव कंटेनरने अॅलपे रिक्षाला धडक दिली. नागपूर- मुंबई महामार्गावर हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये अॅखपे रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. रिक्षामधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांसह चार विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच अहमदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तात्काळ जनार्दन स्वामी रुग्णालयात दाखल केले. तर अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पण काही वेळानंतर वाहतूक सुरळीत झाली. दोन्ही वाहन रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -