गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकार विरुद्ध मनसे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले.. औरंगाबाद येथील सभेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..
सांगलीतील शिराळा येथील एका प्रकरणातही राज ठाकरे यांच्याविरोधात आजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता आणखी एका प्रकरणात बीड जिल्ह्यातील परळी येथील कोर्टानं राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे.. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे..
कोणत्या प्रकरणात वाॅरंट..?
2008 मध्ये मराठी पाट्या आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी परळी येथे मोठं आंदोलन केलं होतं. परळी येथील दुकानं जबरदस्तीने बंद केली होती. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे बसेसचं मोठं नुकसान झालं होतं. याबाबत पोलिसांनी कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे इत्यादी बाबींखाली हे गुन्हे दाखल झाले होते. परळीच्या गुन्ह्यातून याआधी राज ठाकरेंना जामीन मंजूर झाला होता पण कोर्टात सातत्याने गैरहजर राहिल्याने आता राज ठाकरेंवर अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने काढले आहे. आत यावर नक्की कशी कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, आदी बाबींखाली हे गुन्हे दाखल झाले होते. खरं तर परळीच्या गुन्ह्यात याआधी राज ठाकरे यांना जामीन मंजूर झाला होता, पण सातत्याने कोर्टात गैरहजर राहिल्याने राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, 6 एप्रिल रोजीच हे वॉरंट जारी करुनही राज यांच्यावर अजूनही कारवाई का केली नाही, अशी विचारणा कोर्टानं पोलिसांना केल्याचे समजते. परळी कोर्टाच्या अजामीनपात्र वॉरंटमुळे गृह खाते अॅक्शन मोडमध्ये आलंय. याविषयी मुबंई पोलिसांना एक पत्र प्राप्त झालं आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसही कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.