Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगब्रेकिंग : LIC ऑफिसमध्ये भीषण आग

ब्रेकिंग : LIC ऑफिसमध्ये भीषण आग

ताजी बातमी ऑनलाईन टीम


सध्या मुंबई आणि एमआयडीसी भागात आगीच्या घटना वाढत आहेत. मुंबईसह उपनगरामध्ये आग लागण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी आग लागल्याची घटना ताजी असताना आणखी एका ठिकाणी आगीचा भडका उडाला आहे.



मुंबईतील सांताक्रूझ येथील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सकाळची वेळ असल्याने कार्यालयात कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अपघात टळला ही दिलासादायक बाब आहे.

अग्निशमन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावरील सेलरी सेविग स्कीम यूनिटमध्ये ही आग लागली असून ही आग विजेच्या तारा, संगणक, फाइल रेकॉर्ड, लाकडी फर्निचर आदींपर्यंतच सीमित होती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -