Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजनबोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार, कुटूंबासोबत चुकूनही पाहू नका या वेब सिरीज!

बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार, कुटूंबासोबत चुकूनही पाहू नका या वेब सिरीज!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉक्स ऑफीसवर सध्या पॅन इंडिया चित्रपटांचा बोलबाला आहे. तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक ओटीटीकडेही वळले आहे. सध्या वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाहून एक जबरदस्त वेब सिरीज रिलीज होत आहे. या वेब सिरीजना प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र यातील काही सिरीजमध्ये बोल्डनेसने सर्व हद्दी पार केल्या आहेत. या सिरीज कुटूंबासोबत पाहणे मोठी चूक ठरू शकते. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 आगामी वेब सिरीजबाबत सांगणार आहोत ज्या तुम्ही कुटूंबासोबत पाहू शकणार नाहीत.



आधा इश्क
‘आधा इश्क’ ही रोमॅंटिक थ्रिलर वेब सिरीज आहे. यात कश्मीर आणि मसूरी येथील नैसर्गिक सौंदर्य दाखवण्यात आले आहे. या रोमॅंटिक ठिकाणी ही वेब सिरीज शूट करण्यात आली आहे. ‘आधा इश्क’ लव्ह ट्रँगलवर आधारीत आहे. यात मुख्य नाईका ज्या मुलावर प्रेम करते तो तिच्या आईचा एक्स बॉयफ्रेंड असतो. या वेब सिरीजमध्ये अनेक बोल्ड सीन आहेत. त्यामुळे ही वेब सिरीज 18 वर्षा खलील लोकांसाठी पाहण्यायोग्य नाही.

एक थी बेगम
रोमँटिक थ्रिलर ‘एक थी बेगमचा सिरीज 3’ सप्टेंबर 2022 रोजी एमएक्स प्लेअरवर रिलीज होत आहे. या वेब सिरीजमध्ये अशा महिलेची गोष्ट दाखवण्यात आली आहे जी आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका संपूर्ण सिंडीकेटसोबत वैर घेते. यात ती यशस्वी होते का? याबाबत सस्पेन्स दाखवण्यात आला आहे. बोल्डनेसच्या बाबतीत देखील ही वेब सिरीज कमी नाही.

व्हर्जिन रिव्हर सीझन- 4
प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. हॉट वेब सिरीज व्हर्जिन रिव्हरच्या दोन नव्या सीझनला नेटफ्लिक्सतर्फे ग्रीन सिग्नल मिळाला आहे. प्रेक्षक रोमान्स आणि सस्पेन्सने भरपूर या वेब सिरीजच्या आगामी सीझनच्या प्रतिक्षेत आहेत. ही वेब सिरीज कधी रिलीज होईल याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. मात्र एक गोष्ट नक्की ही सिरीज बघण्यासाठी तुम्हाला बंद खोलीची गरज भासेल.

‘द समर आय टर्नेड प्रिटी’
से
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकतीच ‘जेनी हान’च्या कादंबरीवर आधारित नवीन वेब सिरीज ‘द समर आय टर्नेड प्रिटी’ घेऊन येत असल्याची घोषणा केली आहे. ही सिरीज 17 जून रोजी रिलीज होईल. या वेब सिरीजमध्ये एक तरुणी आणि दोन भावांमध्ये लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहे. यातील बोल्डसीन खूप चर्चेत आहेत.

मिर्झापूर सीझन- 3
मिर्झापूरचा सीझन 1 व 2 खूप लोकप्रिय ठरला होता. आता प्रेक्षक या वेब सिरीजची सीझन 3 ची प्रतीक्षा आहे. सप्टेंबर 2022 मध्ये मिर्झापूर- 3 रिलीज होण्याची शक्यता आहे. या वेब सिरीजमध्ये खूप बोल्ड सीन दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या वेब सिरीजला 18 प्लस श्रेणीत टाकण्यात आले आहे. यात खूप बोल्ड सीन तसेच शिवीगाळ आहे. त्यामुळे ही वेब सिरीज एकट्यातच पाहणे योग्य ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -