Friday, February 27, 2026
Homeसांगलीसांगली : शिक्षणाधिकारी, अधीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

सांगली : शिक्षणाधिकारी, अधीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पदवीधर वेतनश्रेणी मान्यता प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तीन शिक्षकांकडून एक लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व अधीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (वय 58, रा. लातूर, सध्या रा. कल्पतरू सोसायटी, विश्रामबाग) व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे (41, अहिल्यानगर, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत.



पथकाने दोघांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. कांबळेच्या घरातून दहा लाख रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सोनवणेच्या घरात तीन लाखांची रोकड सापडली. पथकाने ती जप्त केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ही कारवाई केली. या कारवाईने जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे. कांबळे आणि सोनवणे यांना आज अटक करून न्यायालयापुढे उभा केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

तक्रारदार तीन शिक्षक आहेत. ते सांगली परिसरात राहतात. त्यांनी वेतनश्रेणी मिळविण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कांबळे याच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कांबळे व सोनवणे यांनी प्रत्येकी 60 हजार रुपयांप्रमाणे 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले तरच प्रस्ताव मंजूर केले जातील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षकांनी 26 एप्रिल रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाच्या पथकाने तेंव्हापासून ते 2 मेपर्यंत चौकशी केली. त्यावेळी कांबळे व सोनवणे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. चर्चेअंती दोघांनी एक लाख 70 हजार रुपये तरी द्यावे लागतील, असे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -