कडक उन्हाळ्यामुळे (Summer) अनेक ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईचा (water scarcity ) सामना करावा लागत आहे. अशामध्ये अनेक जण पर्यायी ठिकाणी म्हणजेच नदी, ओढा, तलाव याठिकाणी पाणी आणण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी जात आहेत. अशामध्येच कल्याणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याणमध्ये पाणीटंचाईने एकाच कुटुंबातील 5 जणांचा बळी घेतला. कल्याण ग्रामीण (Kalyan Rural) परिसरातील संदप गावामध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदप गावामध्ये राहणारे पोलिस पाटील गायकवाड कुटुंबातील काही जण पाणी टंचाईमुळे दगड खाणीवर (stone quarry) कपडे धुण्यासाठी गेले होते. पोलिस पाटील सुरेश गायकवाड यांची पत्नी मीरा गायकवाड ही आपली सून आणि ३ नातवंडांना घेऊन खाणीवर गेली होती. त्याचवेळी त्यांचा छोटा नातू पाण्यामध्ये बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चार जणांचा देखील खाणीमध्ये बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देसले पाड्यातील पोलिस पाटील सुरेश गायकवाड यांची पत्नी मीरा गायकवाड (55 वर्षे) या आपली सून अपेक्षा गायकवाड (30 वर्षे), नातू मोक्ष (13 वर्षे), निलेश (15 वर्षे) आणि मयुरेश (15 वर्षे) हे पाच जण दगड खाणीतील पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी शनिवारी सायंकाळी गेले होते. तिन्ही मुलं खाणीच्या काठावर खेळत होती. त्याचवेळी पाय घसरल्यामुळे छोटा मुलगा मोक्ष पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी निलेश आणि मयुरेश यांनी प्रयत्न केला पण ते देखील पाण्यात बुडू लागले. हे पाहून आजी आणि आईने पाण्यात उडी मारुन मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्यामुळे पाचही जणांचा खाणीमध्ये बुडून मृत्यू झाला.
हृदयद्रावक! पाणी टंचाईने घेतला बळी, दगड खाणीत बुडून 5 जणांचा मृत्यू!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -








