ताजी बातमी ऑनलाईन टीम
नाशिक: रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. त्यातही खोत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना अधिक लक्ष्य केलं आहे. पीक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अद्याप मिळा. नाही. शिवसेनेची (shivsena) सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यावरील 10 हजाराचे कर्ज भरणार असल्याचं आश्वासन शिवसेनेने दिलं होतं. 10 हजार तर सोडा शेतकऱ्यांची वीज आता सरकार कापली जात आहे. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार यांनी सांगितले होते. वीज मोफत नाही दिली तर आम्ही पवार यांचे औलाद मानणार नाही असे दादा म्हणाले होते. मग आता तुम्ही कुणाची औलाद आहात हे पवार साहेबांनी सांगावे, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांनी जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियान आम्ही सुरू केलं आहे. हे अभियान नाशिकला पोहोचलं होतं. यावेळी त्यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.
कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाहीये. सरकारी तिजोरीवर र सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दराडो लपविण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सरकारने कष्टकरी वर्गाची चेष्टा सुरू केली आहे. दूध, कांदा प्रश्न गंभीर झाला आहे याकडे सरकार लक्ष देत नाहीये. सरकार विरोधात जे बोलेल त्यांना गुन्हे दाखल करण्याचा काम सुरू आहे. सत्तेत असताना तुम्ही तुडवा, गाडा असे शब्द वापरता. तुम्ही काय औरंगजेबचे औलाद आहात का?, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर नाव न घेता केली.